आमचे कार्य

ग्रामस्वच्छता अभियान

स्वच्छता, आरोग्य आणि लोकसहभागातून ग्रामविकास साधणारा उपक्रम

ग्राम विकासासाठी चळवळ महत्त्वाची आहे आणि या चळवळीत गर्दी किती आहे यापेक्षा दर्दी किती आहे हे महत्त्वाचे आहे आणि खऱ्या अर्थाने खेडी सुधारायची असतील तर चळवळ निर्माण केली पाहिजे. आपल्या घरासमोरील घाण मी काढली पाहिजे.मी गाव रस्ता स्वच्छ ठेवला पाहिजे. शौचालय बांधूनच शौचालयाचा वापर केला पाहिजे. हे ओम आदिनाथ  संस्थेच्या कार्यकर्त्यांनी समजावून सांगितले आहे. कोणतेही विकासाचे काम करताना तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवून काम करण्याचा मंत्र संस्थेचे चेअरमन बाळासाहेब होनमोरे यांनी दिला आहे. ओम आदिनाथ  संस्थेच्या माध्यमातून काम सुरू केलेल्या शेकडो गावांना ग्रामस्वच्छता अभियानाचे पुरस्कार मिळालेले आहेत.

तासगाव तालुक्यातील नागेवाडी गावची मानसिकता बदलून लोकांनी नागेवाडी कायापालट केला आणि या गावचा सलग ०३ वर्षे तालुक्यात प्रथम क्रमांक आला. अशी कितीतरी गावे स्वच्छ आणि सुंदर होणेस ओम आदिनाथ संस्थेचे योगदान मोठे आहे.