आमचे कार्य

गाळ मुक्त धरण, गाळयुक्त शिवार

धरणातील गाळ काढून शेतीसाठी सुपीक माती आणि जलसंधारण साधणारा महाराष्ट्र शासनाचा उपक्रम

महाराष्ट्र राज्य हे देशात जास्त धरणे व जलसाठे असलेले राज्य आहे. राज्यभरातील धरणामध्ये दरवर्षी साचत चाललेल्या गाळामुळे धरणाच्या साठवणूक क्षमतेत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. या धरणामध्ये साचलेला गाळ उपसा करून शेतात पसरविल्यास धरणाची  मूळ साठवण क्षमता  पुनर्स्थापित होण्याबरोबरच कृषी उत्पन्नात अति वाढ होणार आहे ही बाब विचारात घेऊन शासनाने राज्यातील धरणामधीलल गाळ काढणे व शेतामध्ये पसरणे यासाठी ग्रामविकास व जलसंधारण विभाग मार्फत ‘’गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार’’ योजना मध्ये NGO चा सहभाग व लोक सहभाग  घेऊन राबवण्याचे धोरण अवलंबले आहे. शासन निर्णयानुसार ओम आदिनाथ  सेवाभावी संस्था  गाळमुक्त धोरण व गाळयुक्त शिबिर योजना राबवीत आहे.