आमचे कार्य
रेन वॉटर हार्वेस्टिंग
पावसाचे पाणी साठवून जलसंवर्धन आणि शाश्वत ग्रामविकास साधणारा उपक्रम
शिवकालीन पाणी साठवण योजना व ओम आदिनाथ सांप्रदाय सेवाभावी संस्थेने वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा सांगली यांच्यामार्फत सन २००२-०३ ते २००६-०७ अखेर शिवकालीन पाणी साठवण योजना (RAIN WATER HARWESTING )ही योजना तासगाव तालुक्यातील नागेवाडी,जरंडी,कवठेमंकाळ तालुक्यात रायवाडी,जत तालुक्यात येळदरी, गुगवाड, आदी गावामध्ये जल पुनर्भरण कामे अतिशय प्रभावीपणे केली आहेत.
ओम आदिनाथ संस्थेने टंचाईग्रस्त व भूजलाची पातळी खोल गेलेल्या गावात तसेच दुष्काळग्रस्त गावात भूजलाची पातळी अतिखोल गेलेल्या गावातील स्त्रोत बळकटी करणासाठी लोकसहभागातून मोठ्या प्रमाणात कामे केली आहेत. या कामामुळे गावे टँकर मुक्त झाले आहेत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटला आहे. यशस्वी कामाची यशोगाथा सुद्धा प्रसिद्ध झाली आहे.