आमचे कार्य
नैसर्गिक आपत्तीमध्ये संस्थेचे योगदान
पूर, महामारी आणि इतर संकटांमध्ये समाजाला मदत व सहाय्य देणारा उपक्रम
- महापूर:
ओम आदिनाथ सेवाभावी संस्था विविध स्तरामध्ये काम करत असताना समाजातील सर्वच घटकाचा सहानुभूतीपूर्वक विचार करून समाज उपयोगी कार्य करीत आहे. समाज कार्य करीत असताना महापुरासारख्या आपत्तीत सापडलेल्या पूरग्रस्तांना व पूरग्रस्तांच्या जनावरांना सुरक्षित आसरा देऊन जनावरांच्या चारेची व पूरग्रस्तांच्या कुटुंबाची जेवणाची,राहणेची व्यवस्था संस्थेमार्फत केली आहे.
- कोरोना: कोरोना काळामध्ये संपूर्ण जगावर भयानक संकट निर्माण झाले होते. लॉकडाऊनमुळे लोकांना घराबाहेर पडता येत नव्हतं. लहान मुलांना दुधाची ,औषधाची अडचण निर्माण झाली होती. वयोवृद्धांना जगणे असाह्य झाले होते. हातावर पोट असणारे/रोज कष्ट करून जीवन जगत असलेले गोरगरिबांवर उपासमारीची वेळ आली होती.अशावेळी संस्थेने पुढाकार घेऊन जिथे जिथे शक्य आहे, तिथे गरजेप्रमाणे सॅनिटायझर,पीपी किट, जीवन अन्न उपयोगी साहित्य किट, धान्याचे किट, देऊन कोरोनाग्रस्तांना आधार देण्याचा प्रयत्न केला.तसेच कोविड सेंटर मध्ये दाखल असलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना जीवनावश्यक वस्तू व अन्न धान्याचे कीट देऊन समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो ही भावना दाखवून दिली आहे.तसेच कोविड सेंटर मध्ये दाखल असलेल्या कोरोनाग्रस्तांना जेवणाचे डबे,औषधोपचार देण्यासाठी मदत केली आहे.
- दुष्काळ: दर तीन वर्षाने निसर्गाच्या बदलामुळे कमी जास्त प्रमाणात दुष्काळ पडले. २००३-०४ व २००८-०९ मध्ये दुष्काळ पडला होता.जनावरांच्या चाऱ्याचा आणि पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. तेव्हा ओम आदिनाथ स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून जनावरांच्या साठी मोफत चारा वाटप कार्यक्रम घेतला होता.त्यामुळे शेकडो जनावरांचा काही दिवस तरी चाऱ्याचा प्रश्न मिटला होता.