आमचे कार्य

पाणलोट विकास कार्यक्रम

ग्रामीण विकासासाठी राबवलेला महत्त्वपूर्ण उपक्रम

 प्रचंड इच्छा शक्ती आणि जोडीला कष्ट आणि लोकांचा सहभाग यातून संपूर्ण गावाचा कायापालट होऊ शकतो हे ओम आदिनाथ सेवाभावी संस्थेने दुष्काळा विरोधात लढणाऱ्या गावात यशस्वी करून दाखवले आहे. DPAP (DROUGHT PRONE AREAS PROGRAMME) या केंद्र सरकारच्या योजनेमधून सांगली जिल्हा परिषद DRDA मार्फत ओम आदिनाथ संस्थेला पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम (WATERSHED DEVELPOMENT PROGRAME ) अंतर्गत जत, तासगाव, कवठेमहांकाळ, मधील काही गावे मिळाली होती. पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम अंतर्गत गावाचा सर्वांगीण सर्वकष  विकास करणेचे काम संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब होनमोरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हातात घेतले.जत तालुका १) शिंगणहळी २) सोन्याळ ३) येळदरी ४) गुगवाड. कवठेमहांकाळ तालुका १) रायेवाडी.  तासगाव तालुका  १)नागेवाडी २) जरंडी आदी  गावामध्ये काम केले आहे.

या गावामध्ये यशस्वी राबवलेली जलसंधारण ची कामे, शिवकालीन पाणी साठवण योजना यातून गावकऱ्यांनी संपूर्ण गावातील शेतीच्या पाण्याचा,पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवला आहे.संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाच्या निमित्ताने गावात विविध उपक्रम राबवले गेले आहे.हागणदारी मुक्त गाव ‘’निर्मल ग्राम योजना ‘’ या गावातून राबली आहे. अगदी गरीब कुटुंबाला सुद्धा अगदी परवडेल अशा कमि खर्चात शौचालय बांधली आहे.तीन वर्ष दुष्काळ पडला असल्याने शेती ओसाड पडली होती. पाण्याचे महत्व लोकांना समजले होते.नेमके याच वातावरणाची  संधी समजून  ओम आदिनाथ संस्थेने शासनाचे पैसे आणि लोकांचा सहभाग हे पटवून दिले  ‘’वॉटर बजेटिंग’’ चे नियोजन केले. ओसाड शेतावर माती नालाबांध सिमेंट नालाबाद, C.T., लूज बोर्डर, आर्दन इकचर आदी कामे करून गावे पाण्यापासून स्वयंपूर्ण केली आणि भरपूर पाणी झाल्यानंतर गावात तरुणांना रोजगार,महिला बचत गटांना रोजगार शेतकऱ्यांना आधुनिक शेती याचे प्रशिक्षण दिले. अभ्यास सहली काढल्या. दुधाचे उत्पादन वाढले आणि गाव स्वयंपूर्ण झाली.

या पैकीच एक तासगाव तालुक्यातील नागेवाडी  गावातील यशोगाथा सह्याद्री दूरदर्शन दिल्ली येथे ‘’एक गाव कि कहाणी ‘’ या सदराखाली प्रसिद्ध झाली. संस्थेने काम केलेल्या गावांना विविध क्षेत्रात पुरस्कार मिळाले आहेत.