आमचे कार्य

चारा छावण्या

दुष्काळग्रस्त भागात जनावरांसाठी उभारलेल्या चारा छावण्यांचा उपक्रम

महाराष्ट्र मध्ये सन 2002 ते 2003 यावर्षी भयानक दुष्काळ पडला होता. विहिरी कोरडा पडल्या होता. बोअरवेल मधून फक्त हवाच येत होती. पिके वाळून गेले होती. पाण्यासाठी हजारो टँकर धावत होती. एक बादली पाण्यासाठी दिवस दिवस वाट पाहावी लागत होती. जनावरे कसायाला विकली जात होती. हाताच्या फोडाप्रमाणे जपलेली जनावरे चारा पाण्याअभावी कसायाला विकायला लागल्यामुळे लोक डोळ्यात अश्रू ढाळत होते. अशा वेळी चारा छावणी सुरू करणेचे आव्हान शासनाने केले. काही प्रमाणात अनुदान प्रत्येक जनावरांना देण्याचे मान्य केले.त्यावेळी ओम आदिनाथ संस्थेच्या माध्यमातून चारा छावण्या सुरू केल्या. परिसरातील शेकडो जनावरे छावणीत दाखल झाली.जनावराना चारा मिळू लागला. लोक आनंदाने जनावरांची जपणूकू करू लागली आणि ओम आदिनाथ  सेवाभावी संस्थेने सुरू केलेल्या चारा छावण्या या आदर्श छावण्या म्हणून नावलौकिक . लोक समाधानाने सांगू लागले.