आमचे कार्य
निर्मल ग्राम
स्वच्छता, लोकसहभाग आणि ग्रामविकासातून साकारलेला निर्मल ग्राम उपक्रम
प्रत्येक गावामध्ये आणि गावातील प्रत्येक घरामध्ये निर्मल ग्राम अभियान हे चळवळ म्हणून राबवले गेले पाहिजे आणि निर्मलाग्राम अभियान हे ग्रामविकासाच्या चळवळीचा पाया आहे. हे ओम आदिनाथ संस्थेने लोकांना पटवून दिले आहे. शासनाने खेड्याच्या विकासाकडे विशेष लक्ष दिले आहे. ग्राम स्वच्छता अभियान निर्मल ग्राम पुरस्कार योजना विकासासाठी खऱ्या अर्थाने महत्त्वपूर्ण आहे हेही समाजामध्ये ओम आदिनाथ संस्थेने बिंबवले आहे. उप मुख्यमंत्री आर.आर. पाटील यांनी स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून फार मोठी दृष्टी दिली आहे. संपूर्ण देशाला स्वच्छतेचा मंत्र देणाऱ्या आर.आर.पाटलांचे अंजनी हे गाव ओम आदिनाथ संस्थेने हागणदारी मुक्त करण्याचा पुढाकार घेऊन ‘’निर्मल ग्राम पुरस्कार’’ मिळवून देणेत संस्थेचे मोठे योगदान आहे.
पुरुषप्रधान संस्कृती जरी असली तरी जेवढे अधिकार पुरुषांना आहेत. तेवढेच अधिकार महिलांना आहेत.ग्रामसभेने महिलांना अनेक अधिकार दिले आहेत.अधिकाराचा वापर महिलांनी केला पाहिजे. गावाची गरज ओळखून काम केले पाहिजे.गावाने एकीने कोणतेही काम हातात घेतले की ते काम पूर्ण होते. ओम आदिनाथ संस्था फक्त मार्गदर्शन करते हे होनमोरे यांनी ग्रामस्थांच्या मनात बिंबवले आहे. ओम आदिनाथ संस्थेच्या माध्यमातून शेकडो गावे हागणदारी मुक्त होऊन निर्मल ग्राम पुरस्कार मिळाले आहेत. त्या गावात स्वच्छता अभियान राबवले आहे. आज ही शेकडो गावे स्वच्छ आणि सुंदर हागणदारी मुक्त म्हणूनून नावारूपाला आली आहेत.