आमचे कार्य
पुरस्कार
संस्थेच्या कार्याची दखल घेऊन विविध स्तरांवर मिळालेले सन्मान व पुरस्कार
ओम आदिनाथ संस्थेची स्थापना संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब होनमोरे यांनी आपल्या समविचारी सहकाऱ्यांना बरोबर घेवून 28/07/1994 रोजी स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली. संस्थेच्या स्थापनेपासून संस्थेच्या उद्देशाप्रमाणे व समाजातील गरजेनुसार संस्था कार्यरत आहे.संस्थेकडे पुरेसा तज्ञ,नम्र कर्मचारी वर्ग आहे. या सर्वांच्या माध्यमातून काम करीत असताना संस्थेने नाविन्यपूर्ण,समाज उपयोगी उत्कृष्ट काम केल्याने तालुका,जिल्हा,राज्य,देश,विदेश पातळीवर दखल घेऊन तालुका पातळी पासून ते देश पातळीवरील विविध क्षेत्रातील पुरस्कार मिळाले आहेत.
पुरस्काराचे नाव व प्रमाण पत्रे:
- ‘’निर्मल ग्राम पुरस्कार’’: महामहीम राष्ट्रपती डॉक्टर एपीजी अब्दुल कलाम यांच्या हस्ते.
- ‘’महात्मा फुले जल व भूमीसंधारण अभियान पुरस्कार’’: कृषी, जलसंधारण व खारजमीन मंत्री माननीय श्री. बाळासाहेब थोरात साहेब यांच्या हस्ते.
- ‘’संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत ग्राम अभियानातील पाणी व सांडपाणी व्यवस्थापन पुरस्कार’’, माननीय मंत्री श्री. अजितदादा पवार साहेब यांच्या हस्ते.
- ‘’महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम’’ अभियानांतर्गत तंटामुक्त गाव हा पुरस्कार, माननीय मंत्री श्री. आर. आर. पाटील यांच्या हस्ते.
- आकार चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई यांच्यामार्फत दिला जाणारा ‘’आकार जल’’ पुरस्कार जलतज्ञ माननीय श्री. राजेंद्र सिंह राणा यांच्या हस्ते.