आमचे कार्य
पशुधन शिबिर
ग्रामीण भागातील पशुधनाच्या आरोग्य तपासणी व उपचारासाठी आयोजित शिबिर
ग्रामीण भागामध्ये शेतकरी व गोरगरिबांची जनावरे ही त्यांच्या जगण्याचा महत्त्वाचा आधार असतात. अनेक कुटुंबांसाठी पशुधन हे केवळ उत्पन्नाचे साधन नसून त्यांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. लोक आपल्या जनावरांची काळजी पोटच्या लेकरांप्रमाणे घेतात.
शासन आपल्या स्तरावर पशुधनासाठी शासकीय डॉक्टरांमार्फत सेवा उपलब्ध करून देत असते. त्याचबरोबर, ओम आदिनाथ सेवाभावी संस्था आपल्या कार्यक्षेत्रातील गावांमध्ये पशुधनासाठी विशेष आरोग्य शिबिरांचे आयोजन करते.
शिबिरामध्ये दिल्या जाणाऱ्या सेवा:
- जनावरांची आरोग्य तपासणी
- तज्ज्ञ डॉक्टरांकडून योग्य मार्गदर्शन
- आवश्यकतेनुसार औषधोपचार व पुढील उपचारासाठी सल्ला
- पशुधनाच्या निगा व पोषणाबाबत मार्गदर्शन
जनजागृती उपक्रम:
संस्थेच्या वतीने पशुपालकांना नियमितपणे जनावरांची तपासणी करण्याबाबत जागरूक केले जाते.
- वेळच्या वेळी किंवा
- किमान वर्षातून एकदा तरी
आपल्या विभागातील पशुधन डॉक्टरांकडून तपासणी करून घेणे आवश्यक आहे, याचे प्रबोधन केले जाते.