आमचे कार्य
आरोग्य शिबिरे
ग्रामीण व शहरी भागातील लोकांसाठी आरोग्य तपासणी, उपचार व जनजागृतीसाठी आयोजित शिबिरे
ग्रामीण आणि शहरी भागात गरीब गरजू लोकांसाठी आरोग्य शिबिरे अतिशय महत्वाची असतात.
उदा. ग्रामीण भागात प्रत्येकाच्या घरी किंवा जवळच सार्वजनिक ठिकाणी शौचालय नसतात. महिला वर्ग शौचालयाला जाण्यासाठी सायंकाळची वाट पाहत असतात. सायंकाळी अंधार पडला कि, महिला उघड्यावर शौचालयाला जातात. त्यामुळे त्यांना बहुतेक वेळा पोटाचे विकार होतात. तसेच अवेळी अपूर्ण जेवण, कामाचा ताणतणाव, कामाचे व्याप, यामुळे महिलांच्या शरीरात कोणता न कोणता आजार शिरकाव करण्याचा प्रयत्न करीत असतो म्हणून ओम आदिनाथ सेवाभावी संस्थेने ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात आरोग्य कॅम्प राबवली आहेत. वेळच्या वेळी तपासणी करून औषधोपचार दिले आहेत. आरोग्याचे आणि शौचालयाचे महत्व पटवून दिले आहेत. शेतकरी, तरुण, यांची तपासणी करून डॉक्टरनी योग्य सल्ले दिले आहेत.
ओम आदिनाथच्या आरोग्य शिबिरात भाग घेवून शेकडो लोकांनी लाभ घेवून आरामदायी जीवन जगात आहेत.