आमचे कार्य

ICICI बँक लिंकेज TO SHGS

महिला बचत गटांना बँकिंग सुविधा व आर्थिक सक्षमीकरणाशी जोडणारा उपक्रम

ओम आदिनाथ  सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून समाज उपयोगी विविध योजना सुरू आहेत. यापैकीच एक भाग म्हणजे नवीन उद्योजक महिलांना उद्योगासाठी प्रशिक्षण देणे आर्थिक सहाय्य देणे, मार्केटिंग उपलब्ध करून देणे. ICICI बँकेच्या माध्यमातून संस्थेने शेकडो बचत गटांना व्यवसायासाठी कर्ज मिळवून दिले आहे आणि कुटुंबे आर्थिक सक्षम केली आहेत.

संस्थेने मिरज शहर, मालगाव, आरग, बेडग, करोली एम, डोंगरवाडी, पायापाचीवाडी, मालगाव,सुभाषनगर, वड्डी, मैशाळ, नरवाड, सलगर, बेळंकी,सावळी, कळंबी,तानंग, व्यंकोचीवाडी,कवलापूर, सांबरवाडी, हरिपूर,समडोळी, दुधगाव, मल्लेवाडी, कुपवाड, जत, कुंडल,आदी गावातील काही बचत गटांना साधारण 750 बचत गटातील महिलांना नवीन उद्योग करण्यासाठी व उद्योग वाढवण्यासाठी तसेच समाजातील गरीब होत करू दारिद्र्यरेषेखालील,ओपन बचत गटातील महिलांना संस्थेने आर्थिक सहकार्यातून सक्षम केले आहेत.