आमचे कार्य
वसुंधरा पाणलोट विकास यंत्रणा पुरस्कृत एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम (IWMP)
एकात्मिक पाणलोट व्यवस्थापनाद्वारे जलसंधारण, शेती विकास आणि ग्रामविकास साधणारा उपक्रम
एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम अंतर्गत जिल्हा पाणलोट विकास युनिट तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सांगली यांनी दिलेल्या सुचने नुसार व केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनानुसार एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यकम ( IWMP ) अंमलबजावणी मध्ये P.T.O.प्रकल्प प्रशिक्षण संस्था म्हणून क्लटर क्र.IWMP -१८ मध्ये पाणी व्यवस्थापन आणि पिक पद्धती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वी पणे राबवला आहे.शासकीय योजना व लोक सहभाग याचे महत्व पटवून दिले आहे. लोकाच्या सहभागातून केलेली कामे हि ठीकावू शाश्वत असतात आणि लोकाच्या सहभागातून केलेल्या कामाची देखभालीची जबाबदारी सुद्धा लोक काळजीने घेतात हा अनुभव आला आहे.
एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम (IWMP)अंतर्गत २००९-१० मध्ये संस्थेच्या वतीने सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करून सर्वेचे काम केले आहे.सदरचे काम केंद्र व राज्यशासनाच्या मार्गदर्शन सूचनानुसार अत्यंत योग्य पद्धतीने केले आहे. शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार अत्यंत प्रभावीपणे केले आहे.